नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा धोका ! प्रशासनाकडून अलर्ट जारी; २० ते २५ मिनिटांत..
नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा धोका ! प्रशासनाकडून अलर्ट जारी; २० ते २५ मिनिटांत..
img
Nandini khandare More
आधीच नेपाळ मध्ये आलेल्या महाप्रलयाने होत्याच नव्हतं केलं असून आता नेपाळमध्ये पुन्हा महापूर येण्याचा इशारा दिला आहे. नुवाकोट जिल्ह्यावर हे महापूराचे संकट आहे. प्रशासनाकडून नागिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धंडे बाजार आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरित होण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्याची पातळी वाढत चालली आहे त्यामुळे पुढच्या २० ते २५ मिनिटांत पुराचे पाणी या भागात येऊ शकते.

धुंडे बाजारमध्ये पोलिस आणि प्रशासकीय पथके नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत करत आहेत. नागरिकांना त्यांची घरे आणि दुकाने रिकामी करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा वारंवार प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. याठिकाणी धोका वाढत असून कोणताही निष्काळजीपणा महागात पडू शकतो, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी रहिवाशांना दिला. संभाव्य पुराचे स्वरूप पूर्वीपेक्षा खूपच गंभीर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करणे गरजेचे आहे. 

नुकत्याच आलेल्या भोटेकोशी-त्रिशुली पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी नुवाकोट एक होता. अनेक रस्ते आणि पूल आधीच पूरामुळे वाहून गेले आहेत. बचावकार्य सुरू आहे. आता आणकी एक महापूर येणार असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नेपाळच्या लष्कराने खबरदारीचा उपाय म्हणून दीड तासांसाठी बचावकार्य थांबवले आहे. ज्या तलावाला पूर्वी फुटण्याचा धोका होता. त्यातील पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी खालच्या दिशेने जास्त प्रमाणात वाहत जात आहे. त्यामुळे बचाव पथकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. बचावकार्यात अडथळे येत आहेत. पोलिस आणि स्थानिक प्रशासन सध्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून नदीच्या पाण्याच्या पातळीतील कोणताही बदल गांभीर्याने घेतला जात आहे.

नुकत्याच आलेल्या भोटेकोशी-त्रिशुली पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी नुवाकोट एक होता. अनेक रस्ते आणि पूल आधीच पूरामुळे वाहून गेले आहेत. बचावकार्य सुरू आहे. आता आणकी एक महापूर येणार असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नेपाळच्या लष्कराने खबरदारीचा उपाय म्हणून दीड तासांसाठी बचावकार्य थांबवले आहे.

ज्या तलावाला पूर्वी फुटण्याचा धोका होता. त्यातील पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी खालच्या दिशेने जास्त प्रमाणात वाहत जात आहे. त्यामुळे बचाव पथकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. बचावकार्यात अडथळे येत आहेत. पोलिस आणि स्थानिक प्रशासन सध्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून नदीच्या पाण्याच्या पातळीतील कोणताही बदल गांभीर्याने घेतला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group