सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. कारण आता सोन्याच्या भावात घाशीराम झाली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडमोडींमुळे सोने आणि चांदीचे दर हे सतत वाढताना दिसत होते. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे तर चांदीचे दर हे स्थिर आहेत. सोन्याच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण आहे. ही घसरण किरकोळ असल्यामुळे ग्राहक सोन्याचे दर आणखी कमी होण्याची वाट पाहात आहेत.
आज, 26 ऑगस्ट रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 66 हजार 345 रुपयांवर पोहोचले आहेत. काल हेच दर 1 लाख 66 हजार 845 रुपये होते.दुसरीकडे एक किलो चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे. आज एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपयांवर गेले आहेत.