दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून आज वसुबारसचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र, सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात मोठी ऐतिहासिक दर वाढ झाली आहे.
आलेल्या अपडेटनुसार , गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर जीएसटीशिवाय १ लाख ४५ हजार रुपये झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीशिवाय १ लाख ९५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या एका दिवसात झालेल्या या मोठ्या वाढीमुळे बाजारातही चर्चा सुरू झाली आहे.
२४ तासांत सोनं ७ हजारांनी महागलं सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दरवाढ मोठा धक्का आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.आज २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय १ लाख ४५ हजार रुपये झाला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
आजचा सोन्याचा दर (रुपयांत) १ ग्रॅम २४ कॅरेट सोने - १४,६०२ २२ कॅरेट सोने १३,३८५ १८ कॅरेट सोने ₹१०,९५२ ८ ग्रॅम २४ कॅरेट सोने - १,१६,८१६ २२ कॅरेट सोने - १,०७,०८० १८ कॅरेट सोने - ८७,६१६ १० ग्रॅम २४ कॅरेट सोने - १,४६,०२० २२ कॅरेट सोने - १,३३,८५० १८ कॅरेट सोने १,०९,५२० १०० ग्रॅम २४ कॅरेट सोने - १४,६०,२०० २२ कॅरेट सोने - १३,३८,५०० १८ कॅरेट सोने - १०,९५,२००
चांदीच्या दरात १५ हजारांची वाढ सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत चांदी तब्बल १५ हजार रुपयांनी महागली आहे. आज चांदीचा दर जीएसटीशिवाय १ लाख ९५ हजार रुपये झाला आहे. चांदीचे दागिने, भांडी आणि इतर वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही या दरवाढीचा परिणाम जाणवणार आहे.