सोन्याच्या दरात घसरण ! आजचे 24K, 22K, 18K सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात घसरण ! आजचे 24K, 22K, 18K सोन्याचे दर जाणून घ्या
img
वैष्णवी सांगळे
जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचा डॉलर अधिक मजबूत झालाय. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झालाय. गुरूवारी सराफा बाजार उघडताच भारतामध्ये सोन्याचे दर घसरले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियामध्ये सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या. 

आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,८४० रुपयांवर आला. एक ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १२० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली. २२ कॅरेटचे सोनं प्रति ग्रॅम ११० रूपयांनी स्वस्त होऊन १४,५२० रुपयांवर आलेय. तर १८ कॅरेटचे सोनं ११८८० रूपये प्रति ग्रॅम आहे. बुधवारच्या तुलनेत १८ कॅरेट सोन्याची किंमत ९० रूपयांनी स्वस्त झाली.

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर -

ग्रॅम १५,८४० रुपये - १२० रुपयांनी स्वस्त

१० ग्रॅम १,५८,४०० रुपये -१२०० रुपयांनी स्वस्त

२२ कॅरेट सोन्याचा दर

प्रति ग्रॅम १४,५२० रुपये - ११० रुपये कमी

प्रति १० ग्रॅम १,४५,२०० रुपये - १,१०० रुपयांनी स्वस्त

१८ कॅरेट सोन्याचा दर

प्रति ग्रॅम - ११८९५ रुपये - ९० रुपये कमी

प्रति १० ग्रॅम ११८९५० रुपये - ९०० रुपयांनी स्वस्त

इतर बातम्या
Join Whatsapp Group