मोठी बातमी ! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
मोठी बातमी ! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठी चढ उतार होत असून आता सोने चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोने खरेदीबाबत मोठे आवाहन केले. गरज नसेल तर सोने खरेदी टाळा, असे त्यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर विदेशातील लग्नही टाळण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. 

नरेंद्र मोदी सध्या विदेश दाैऱ्यावर आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हे मोठे आवाहन केले. सोने खरेदीबाबत सरकारकडून सातत्याने हे आवाहन केले जात आहे.
 परदेशी चलनावरील दबाव टाळण्यासाठी सरकार अशी पाऊले उचलत आहे. इंपोर्ट ड्युटी सोन्यावरील कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात सरकार आहे. सोन्यावर 6 टक्के इंपोर्ट ड्युटी होती, लोकांनी सोने खरेदी टाळावे, याकरिता सरकारने ती थेट 15 टक्के केली. मात्र, सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट बेकायदेशीर गोष्टी अधिक घडताना दिसल्याचे सरकारच्या लक्षात आले.

इंपोर्ट ड्युटी सरकारकडून कमी करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. ज्यामुळे सोन्याचे भाव थेट कमी होऊ शकतात. त्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले. आज 1 सप्टेंबर रोजी MCX वर सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. सोन्याचा दर 310 रूपयांनी घसरला प्रति 10 ग्रॅम 154150 रुपयांवर व्यवहार करत आहे.

आज चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 5 रुपयांची घसरण होऊन 250 रुपयांवर आला आहे. आता 10 ग्रॅम चांदीचा दर 2500 रुपये आहे, तर 100 ग्रॅम चांदीचा दर 25000 रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीच्या दरात 5000 रुपयांची घट होऊन 250000 रुपये झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर चांदी स्वस्त होताना दिसली.

बाजार विश्लेषक टोनी सायकामोर यांच्या हवालानुसार, फेडचे अध्यक्ष केविन वॉर्श यांची कठोर भूमिका आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वाढता तणाव याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्यातच याचा परिणाम सोन्याच्या दरावरही झाली आहेत. सोने पुन्हा स्वस्त होताना दिसत आहेत. चांदीच्या भावातही घसरण नोंदवण्या आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group