सावधान! घरभेदी निघाली 'ती'; पुण्यात ओळखीच्याच महिलेने १० तोळे सोन्यावर मारला डल्ला!
सावधान! घरभेदी निघाली 'ती'; पुण्यात ओळखीच्याच महिलेने १० तोळे सोन्यावर मारला डल्ला!
img
नितीशा कुलकर्णी








सध्या चोरीचे प्रमाण खुप वाढले आहे. जवळचीच व्यक्ती पारख ठेवून असते आपल्या घरावर त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवतांना विचार करावा. पुण्यात अशिच एक चोरीची घटना घडली आहे.

चोरी करणाऱ्या  आरोपी महिलेला फिर्यादीच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची पूर्ण कल्पना होती. तिने आधीच घराच्या मुख्य दरवाजाची एक बनावट चावी तयार करून घेतली होती.  महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घरफोडीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलिसांनी तब्बल १३ लाख ८७ हजार रुपयांचे १० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, ज्या महिलेने ही चोरी केली, ती फिर्यादीच्या ओळखीचीच निघाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे महिलेला अटक करून

बनावट चावीचा वापर करून साधली संधी

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २२) ही चोरीची घटना घडली होती. आरोपी महिलेला फिर्यादीच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची पूर्ण कल्पना होती. तिने आधीच घराच्या मुख्य दरवाजाची एक बनावट चावी तयार करून घेतली होती. बुधवारी घरमालक बाहेर असल्याची संधी साधून तिने बनावट चावीने घरात प्रवेश केला आणि कपाटातील १० तोळे दागिने लंपास केले.

सीसीटीव्हीने उघड केली चोरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्रावून फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोलिसांना या परिचयातील महिलेवर संशय आला. तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा सर्व ऐवज तिने पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही मोहीम राबवली. घरफोडीचा एवढा मोठा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणून पूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे चाकण आणि महाळुंगे परिसरात पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group