बायको असूनही अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले!  तब्बल चार  राज्यांत फिरवलं; अखेर तरुण पोलिसांच्या ताब्यात
बायको असूनही अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले! तब्बल चार राज्यांत फिरवलं; अखेर तरुण पोलिसांच्या ताब्यात
img
Nandini khandare More
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी  समोर आली आहे. पत्नी असतानाही शेजारी राहणाऱ्या अवघ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या 34 वर्षीय विवाहित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.30 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या मुलीला त्याने देवदर्शनाच्या नावाखाली तिरुपती, अक्कलकोट, गाणगापूर ते जगन्नाथ पुरी अशी चार राज्यांत फिरवले.अखेर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सापळा रचून गुन्हे शाखेने मुलीची सुखरूप सुटका केली आणि नराधमाला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार , ​विवाहित असूनही १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या मुंबईतील ४ वर्षीय तरुणाला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या (अंबड युनिट-३) पथकाने नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून सापळा रचून अटक केली आहे. तब्बल १३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीची (Girl) सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून, संशयिताने तिला तिरुपती बालाजीसह विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविल्याची माहिती तपासात समोर आली आहे. शहर शोधा

प्रशांत ऊर्फ रवी गायकवाड (वय ३४, रा. पोस्टल कॉलनी, चेंबूर पूर्व, मुंबई) असे अटकेतील संशयिताचे (Suspected) नाव आहे. चेंबूर पूर्व परिसरात परिसरात राहणारी १६ वर्षे ८ महिने वयाची मुलगी माटुंगा येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकते. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी महाविद्यालयाची परीक्षा आटोपून ती घरी परतली. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या आजीच्या घरी जेवण केल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. विशेष म्हणजे, तिने मोबाईल फोन घरीच ठेवला असल्याने तिचा शोध घेणे कुटुंबीयांसाठी (Family) आव्हान ठरले होते. पालकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  

देवदर्शनाच्या नावाखाली चार राज्यांत प्रवास

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रशांत गायकवाड हा पीडित मुलीच्या नातलगांच्या घरालगतच्या परिसरात राहणारा असून तो विवाहित आहे. त्याला पहिली पत्नी असतानाही त्याने या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून आणि फूस लावून आपल्यासोबत पळवून नेले. ३० ऑक्टोबरपासून त्याने तिला आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी, कोल्हापूर, अक्कलकोट (सोलापूर), गाणगापूर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी अशा विविध तीर्थक्षेत्री फिरवल्याचे निष्पन्न झाले आहे.
अपहृत मुलगी नाशिकरोड रेल्वे स्थानक  परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा अंबड युनिट तीनचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी (दि. १२) रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पोलीस अंमलदार गौरव धात्रक यांनी मुलीला अचूक ओळखल्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. तिच्यासोबत असलेल्या प्रशांत गायकवाड यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघांनाही मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group