एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दहा वर्षांच्या मुलीने चक्क १८ महिन्यांचा बाळाला इमारतीवरुन फेकले असल्याची घटना घडली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे एका दहा वर्षांच्या मुलीने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरातील १८ महिन्याच्या बाळाला उचलून इमारतीखाली फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही तपासले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एडीआर दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव पूर्व येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका दहा वर्षांच्या मुलीने शेजारी घरातील अठरा महिन्याच्या बाळाला इमारतीच्या वरुन फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेप्रकरणात पोलिसांंनी एडीआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही तपासण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास दिंडोशी पोलिसांकडून सुरु असल्याची माहिती आहे.