खळबळजनक ! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडली अन...
खळबळजनक ! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडली अन...
img
Nandini khandare More
पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही  घटना पुण्यामध्ये  घडली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हेपोलिस उपनिरीक्षक कार्यरत होते. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या का केली यामागचे कारण समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश भाऊसाहेब पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील औंध परिसरात ते वास्तव्यास होते. त्यांनी आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. राहत्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं. गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासचा परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी निलेश पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. निलेश पाटील हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. या आजाराच्या नैराश्यातून त्यांनी आज त्यांच्या राहत्या घरी सर्विस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group