मेरठमधील चर्चित निळा ड्रम हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली होती.दरम्यान आता हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. मेरठ न्यायालयाने या हत्या प्रकरणात मुस्कान आणि साहिल या आरोपींना दोषी ठरवले आहे. दरम्यान शिक्षा सुनावण्याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
सुनावणीदरम्यान मुस्कान आणि साहिल हे दोन्ही आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. निकाल जाहीर करण्यापूर्वी न्यायाधीशांनी मुस्कानला विचारले,"आज निकालाचा दिवस आहे. मुस्कान, तुला काय वाटते? जे करणे आवश्यक होते, ते आम्ही केलंय.पुढे प्रश्न करताना न्यायाधीशांनी मुस्कानला म्हटलं की, आज शिक्षा सुनावली जाणार नाही, तुला काय वाटते? या गुन्ह्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. यावेळी न्यायालयाने मुस्कानलाच तिला कोणती शिक्षा योग्य वाटते ते तिनेह सुचवावे असं सागितलं.
१२६ सुनावण्या, २२ साक्षीदार आणि एक प्रदीर्घ खटला सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि साहिल यांच्या अटकेनंतर, न्यायालयात १२६ सुनावण्या झाल्या. एकूण २२ जणांनी साक्षीदार म्हणून साक्ष दिली आणि सुमारे १९ महिने चाललेल्या प्रदीर्घ खटल्यानंतर या दोघांनाही दोषी ठरवण्यात आले.
शिक्षा कधी सुनावली जाणार? सौरभ राजपूतचे कुटुंब मुस्कान आणि साहिलला त्यांच्या कृत्यांची शिक्षा लवकरात लवकर मिळावी, या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयाने शिक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र या दोन दोषींना फाशीची शिक्षाच व्हावी, अशी मागणी सौरभच्या कुटुंबीयांनी केली आहे. जर फाशीची शिक्षा सुनावली गेली नाही, तर न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याची त्यांची तयारी आहे.