खळबळजनक ! रुग्णालयातील बाथरुमध्ये आढळला डॉक्टरचा  मृतदेह
खळबळजनक ! रुग्णालयातील बाथरुमध्ये आढळला डॉक्टरचा मृतदेह
img
Nandini khandare More

रुग्णालयातील बाथरुमध्ये डॉक्टरचा मृतदेह आढळला असल्याची  खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.राजस्थानमधील जोधपूरच्या एम्स रुग्णालयातील हि घटना आहे.जोधपूरच्या एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलले. राज नरेश यादव असं या आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव होते ते अलवरचे रहिवासी होते. त्यांनी इंजेक्शन घेत आयुष्य संपवलं. या घटनेचा तपास सध्या जोधपूर पोलिस करत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही.

आत्महत्येची माहिती मिळताच एम्सने तात्काळ पोलिसांना कळवले. बसनी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी डॉक्टरच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, अलवरचे रहिवासी आणि एम्सच्या भूलशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचे निवासी डॉक्टरने आत्महत्या केली. डॉ. राज नरेश यादव(३१ वर्षे) हे मंगळवारी ऑपरेशन थिएटरमध्ये ड्युटीवर होते.

डॉक्टर राज दुपारच्या वेळी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर गेले. जवळपास दीड तास झाले तरी ते परत आले नाही. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. काळजी वाटू लागली म्हणून त्यांनी त्यांचा शोध घेतला. डॉक्टर राज यांच्या शोधात त्यांचे सहकारी डॉक्टर मित्र ऑपरेशन थिएटरच्या विश्रांती कक्षात केले. त्याठिकाणच्या बाथरूमचा दरवाजा बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजवून देखील डॉक्टर राज आतून उत्तर देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. आतमधील चित्र पाहून ते घाबरले. डॉ. राज बेशुद्ध अवस्थेत खाली पडले होते. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला आणि आपत्कालीन उपचार करण्याचा प्रयत्नन केला. पण तोपर्यंत डॉक्टरचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासातून असे दिसते की डॉक्टरक राज नरेशने स्वतःला इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. इंजेक्शनचा नेमका प्रकार अद्याप कळलेला नाही. शवविच्छेदनानंतरच संपूर्ण तपशील समोर येईल. एम्सने या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. डॉक्टर राज हे बऱ्याच कालावधीनंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group