सासूच्या कपाटातून सुनेने लांबवली 30 तोळे दागिन्यांसह 10 लाखांची रोकड
सासूच्या कपाटातून सुनेने लांबवली 30 तोळे दागिन्यांसह 10 लाखांची रोकड
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरी कोणी नसल्याची संधी साधून सुनेने सासूचे 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 10 लाख रुपये रोख असा एकूण 27 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना होलाराम कॉलनी परिसरात घडली.

फिर्यादी श्रीमती नारंग  (वय 78) या 24 नोव्हेंबर रोजी मुलासमवेत मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संधी साधून संशयित सूनेने सासूच्या कपाटात ठेवलेले 16 लाख 90 हजार रुपये किंमतीचे 294 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 10 लाख रुपये रोख असा एकूण 26 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. 

चोरी केलेल्या दागिन्यांमध्ये प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे नेकलेस, 60 ग्रॅम वजनाच्या 3 सोनसाखळ्या, 50 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, 30 ग्रॅमचे सोन्याचे कडे, 20 ग्रॅमच्या हिरेजडीत दोन अंगठ्या व 34 ग्रॅम वजनाचे कानातले जोड या दागिन्यांचा समावेश होता. 
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group