नाशिकच्या संग्राम मोराडेचा एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा भीम पराक्रम
नाशिकच्या संग्राम मोराडेचा एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा भीम पराक्रम
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात येत असलेल्या आमंत्रितांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा फिरकी गोलंदाज संग्राम मोराडे याने एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. संपूर्ण सामन्यात त्याने 16 गडी बाद केले. यामध्ये हॅट्रिकचा समावेश आहे.

पुणे येथे युनायटेड क्लब विरुद्ध एबीसीए चंद्रस यांच्यात झालेल्या दोन दिवसीय सामन्यात चंद्रस संघाकडून खेळताना संग्राम मोराडे याने ही कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात पंचवीस धावांत सहा गडी बाद केले. दुसऱ्या डावात 33 धावांतच संपूर्ण संघ म्हणजे दहाच्या दहा गडी तंबूत पाठवण्याचा भीम पराक्रम केला.

संग्रामची ही कामगिरी भारताचे माजी कसोटीपटू अनिल कुंबळे यांच्या दहा विकेटची आठवण करून देणारी ठरली. संग्राम हा नाशिक येथील मेरी मैदानावर सराव करत असतो. त्याला श्रीपाद भट यांचे मार्गदर्शन लाभत असते. त्याचबरोबर गोपीनाथ जाधव, अभिषेक जाधव आणि किरण मोराडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group