सुप्रसिद्ध सायंताराचे FSSAI नोंदणी प्रमाणपत्र निलंबित;
सुप्रसिद्ध सायंताराचे FSSAI नोंदणी प्रमाणपत्र निलंबित; "हे" आहे कारण
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - भद्रकालीतील सुप्रसिद्ध असलेल्या सायंतारा साबुदाणा वडा व बटाटा कचोरी सेंटरचा FSSAI नोंदणी प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासन विभागाने तत्काळ निलंबित केला आहे.

अस्वच्छ परिस्थितीमध्ये खाद्यपदार्थ तयार करून साठवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दसरा दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली.

नाशिकमध्ये देखील अनेक आस्थापनांवर अस्वच्छता, मिलावती पदार्थ तयार करणे तसेच मिठाई मध्ये भेसळ करणे यासह विविध कारणांनी नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने, अन्न विभागाचे विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली होती. दिवाळी संपल्यानंतर आपल्या कारवाईचा धडाका हा सुरूच ठेवलेला आहे. 

दिवाळीनंतर कारवाई करताना नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त मंगेश धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी भद्रकाली परिसरामध्ये असलेल्या सायंतारा साबुदाणा वडा बटाटा कचोरी सेंटर या दुकानाची तपासणी करून या ठिकाणी अस्वच्छ परिस्थितीमध्ये खाद्यपदार्थ तयार करणे तसेच साठवणूक केल्याचे आढळले.

या ठिकाणी खाद्यपदार्थ व कच्च्या मालाची साठवणूक अस्वच्छ परिस्थितीमध्ये केली जात असल्याचे देखील समोर आले आहे. या सर्व परिस्थिती मुळे अन्नपदार्थ दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून या सायंतारा साबुदाणा वडा बटाटा कचोरी सेंटरचे FSSAI नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group