सातपूरला दुचाकी घसरून अपघात; २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
सातपूरला दुचाकी घसरून अपघात; २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
img
दैनिक भ्रमर

सातपूर - येथील महिंद्रा सर्कलजवळील टाऊन पोलिस चौकीसमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सौरभ बैरागी (वय २२, रा. अहिल्याबाई होळकर चौक, अशोकनगर, जाधव संकुल) असे मृत युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ बैरागी हा दुचाकीवरून सातपूर एमआयडीसीमार्गे टाऊन पोलिस चौकी ते महिंद्रा सर्कल या रस्त्याने सीबीएस येथे मित्राला सोडविण्यासाठी  जात असतांना टाऊन पोलिस चौकीसमोर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. यात सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

या अपघातात सौरभसोबत असलेला त्याचा मित्रही जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हवालदार किशोर बेंडकुळे करीत आहेत. सौरभ हा क्रिचन ट्रॉलीचे काम करत होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group