सुनेबद्दल वापरलेल्या अपशब्दांनी आजीची सटकली ! 70 वर्षीय महिलेने प्रियकरालाच संपवले
सुनेबद्दल वापरलेल्या अपशब्दांनी आजीची सटकली ! 70 वर्षीय महिलेने प्रियकरालाच संपवले
img
Nandini khandare More

गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ  झाली असून आता अनेक विचित्र आणि धक्कदायक अशा घटना उघडकिस येत असून आता चक्क एका 70 वर्षीय महिलेने प्रियकरालाच संपवले असल्याची घटना घडली आहे. आणि त्याहूनही अधिक धक्कादायक म्हणजे या हत्येचं कारण आहे. 

गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या दोन वृद्धांच्या प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट झाला आहे. प्रियकराने आपल्या सुनेबद्दल अपशब्द काढल्याने संतापलेल्या 70 वर्षीय महिलेने त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आला आहे. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मंगल होनमाने यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील शंकर गाव येथील 70 वर्षीय अंबादास खांडेकर आणि त्याच वयाच्या मंगल होनमाने यांच्यात गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंबादास हे नियमितपणे मंगल यांच्या घरी ये-जा करत होते. त्यांच्या संबंधांची गावात चर्चा असली तरी त्याबाबत कोणी उघडपणे बोलत नव्हते.

पोलिसांच्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी अंबादास हे मंगल यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी मंगल यांच्या सुनेबद्दल कथितरित्या अपशब्द काढले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर मंगल यांनी कोयत्याने अंबादास यांच्यावर वार केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या हल्ल्यात अंबादास यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये, यासाठी मृतदेह एका शेतात नेऊन अर्धवट जाळण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group