BAMS डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर
BAMS डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर
img
Nandini khandare More
अवघ्या २२ वर्षांच्या आदित्य रावते या तरुण बीएमएस (BAMS) डॉक्टराचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही  घटना अमरावती शहरात घडली आहे.  समोर आलेलया  माहितीनुसार , गोरे होण्यासाठी स्वतःहून औषधे घेणे त्याला महागात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. औषधांच्या ओव्हरडोसमुळेच आदित्यचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे अमरावतीसह वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यने नाशिक येथून बीएमएस (BAMS) पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर तो अमरावतीतील एका नामांकित रुग्णालयात शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी तो खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आदित्य मृतावस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मृत आदित्यला लहानपणापासूनच फिटचा (अपस्मार) आजार होता, तसेच स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी तो स्वतःवरच उपचार करत काही औषधे घेत असल्याची माहिती मिळत आहे...यातूनच औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. आदित्य त्याच्या खोलीत उलटा झोपलेल्या अवस्थेत आढळला असून त्याच्या डोळ्यांतून रक्त येत होते, असे समोर आलेय.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासानुसार, आदित्य स्वतः गोरे होण्यासाठी काही औषधे घेत होता. या औषधांचा अतिरिक्त डोस (ओव्हरडोस) झाल्यामुळेच त्याचा जीव गेला असावा, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पोस्टमार्टम अहवालात श्वासावरोध, हृदयविकाराचा झटका किंवा इतर कारणांची तपासणी केली जात आहे. व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पालकांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group