पत्नीसोबत सुरू असलेले भांडण सोडवायला गेल्याचा राग मनात धरून मुलाने जन्मदात्या आईचा खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोतीवाला कॉलेज हनुमान वाडी ध्रुवनगर मारुती मंदिर शेजारी ही घटना घडली. कमळाबाई राजाराम वळवी (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे.
संशयित आरोपी तानाजी राजाराम वळवी (वय 40) याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यासह पोलीस दाखल झाले होते. मृत वृद्ध महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले.
अधिक तपास पोलिसांकडून चालू आहे