संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून अत्याचार , पीडिता गरोदर अन...
संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून अत्याचार , पीडिता गरोदर अन...
img
Nandini khandare More
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून आजची स्त्री ही  कुठेही सुरक्षित नसल्याचं अनेक घटनांमधून उघड झालं आहे. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्याच्या भोर तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. दोन अल्पवयीन चुलत भावांनी १४ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली. तिच्या प्रसूतीनंतर हा संतापजनक घटना उघडकीस आला. पीडित मुलीच्या फिर्यादनंतर दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या दोन चुलत भावांनी पीडित मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित अल्पवयीन मुलीवर आरोपींनी जानेवारी २०२६ मध्ये बळजबरीने दोन-तीन वेळा माळरानावर नेऊन बलात्कार केला. पीडित मुलगी घाबरल्याने हा प्रकार आजतगायत कोणालाही सांगितला नव्हता. आरोपी पीडितेला वारंवार त्रास देत होते.

मात्र अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलगी ससून रुग्णालय येथे उपचारासाठी गेली असता पीडीतेची प्रसूती झाली. ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोर पोलिस ठाण्याशी संपर्क करून संबंधित घटनेची माहिती दिली. दरम्यान भोर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेत पीडित मुलीचे जाबजबाब नोंदविले. पीडितेची फिर्याद दाखल करून घेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. बहीण भावांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group