नाना पाटेकर यांचा शेवटचा Video व्हायरल;  नाचले, तबला वाजवला अन ...
नाना पाटेकर यांचा शेवटचा Video व्हायरल; नाचले, तबला वाजवला अन ...
img
Nandini khandare More
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे निधन झालं त्यामुळे मनोरंजनविश्वासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. नानांच्या आठवणीत सर्वच जण अत्यंत भावूक असून नाना आता आपल्यात नसल्याचं अविश्वसनीय आहे. दरम्यान, आता या दुःखद बातमीनंतर नाना पाटेकर यांचा निधनापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर अगदी उत्साहात आणि आनंदी वातावरणात तरुणाईसोबत वाद्य वाजवताना दिसत आहेत.

पीटीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाना पाटेकर यांनी गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा पर्यटन दिन’ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थित कलाकारांसोबत संवाद साधला. एवढंच नाही तर कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद घेत त्यांनी त्यांना उत्स्फूर्त दादही दिली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर काही कलाकारांसोबत नृत्य करताना दिसत आहेत. त्याचबरोबर ते तबलाही वाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहून काही क्षणांपूर्वीच ते आपल्यात होते, याची जाणीव हा व्हिडिओ पाहणाऱ्या चाहत्यांना होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी भाषणही केले होते. कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांनी रंगभूमीशी असलेले आपले नाते व्यक्त केले. आपल्याला पुढेही रंगभूमीवर काम करत राहायचे असून केवळ नाटकं करत राहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करत आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते भावूक झाले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group