आज सीजेपीची ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, हजारो पोलीस तैनात; दिल्लीत काय घडतंय ?
आज सीजेपीची ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, हजारो पोलीस तैनात; दिल्लीत काय घडतंय ?
img
Nandini khandare More

राजधानी दिल्लीत आज सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्यात आलं असून, संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदारयाद्यांच्या पुनरावलोकन प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

नवी दिल्लीत आज सायंकाळी ५ वाजता सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली निघणार आहे. कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क परिसरामध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे आंदोलन होत आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने सेंट्रल पार्क आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पार्कमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाला विरोध करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यामध्ये आंदोलनामुळे व्यावसायिकांना होणाऱ्या नुकसानीचा उल्लेख करत बंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाला बंदी घालण्यास नकार दिला.

तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा व्यावसायिकांना नुकसान झाल्यास भरपाईचे अधिकार अबाधित ठेवले. दिल्लीप्रमाणेच मुंबईतही आझाद मैदानावर लहरा दो तिरंगा आंदोलन सुरू आहे. दोन्ही शहरांमध्ये आंदोलनामुळे वातावरण तापले असून,कोणत्याही अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group