मोठी बातमी  !  MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित
मोठी बातमी ! MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या  एमपीएससी  आंदोलनावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान आता विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं

गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेलं एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलनअखेर स्थगित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार  यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण सक्तीच्या रजेवर जात असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी येत शासनाची बाजू मांडली. यानंतर दोन्ही बाजूने चर्चा झाली. विद्यार्थी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर ठाम राहिले. अखेर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समाविष्ट असलेल्या चौकशी समितीकडून पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सध्याचे एमपीएससी अध्यक्ष पदापासून दूर राहतील, अशी अट विद्यार्थ्यांनी ठेवली. या अटीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बातचित केली. त्यानंतर राज्य सरकारला 10 मिनिटांचा वेळ देण्यात आला. या दहा मिनिटांत एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपण चौकशी होईपर्यंत रजेवर जाणार असल्याचं ट्विट केलं. यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group