मोठी बातमी ! महाराष्ट्राला मिळणार ३ नवे महामार्ग; ''या'' ६ जिल्ह्यांतून जाणार मार्ग!
मोठी बातमी ! महाराष्ट्राला मिळणार ३ नवे महामार्ग; ''या'' ६ जिल्ह्यांतून जाणार मार्ग!
img
Nandini khandare More
महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पूर्व विदर्भासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. विदर्भाच्या विकासाला वेग देण्यासाठी तब्बल ४२ हजार कोटी रुपयांचा महामार्गांचा मेगाप्लॅन पुढे आला असून, यामध्ये ३ नव्या द्रुतगती महामार्गांसह नवेगाव मोरे ते सुरजगड मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे पूर्व विदर्भातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होण्यासोबतच उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

पूर्व विदर्भातील दळणवळणाला नवी दिशा देणाऱ्या नागपूर ते गोंदिया महामार्ग, नागपूर ते चंद्रपूर महामार्ग, भंडारा ते गडचिरोली द्रुतगती महामार्गासह नवेगाव मोरे ते सुरजागड मार्गाच्या निधीला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली. ४६० किलोमीटरच्या चारही प्रकल्पांचा एकत्रित प्रकल्प खर्च तब्बल ४२ हजार कोटीहून अधिक आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी स्वतंत्र विशेष उद्देश वाहन अर्थात 'एसपीव्ही' स्थापन करण्यात आले आहेत. या महामार्गामुळे पूर्व विदर्भातील कृषी खनिज आणि औद्योगिक वाहतुकीला चालना मिळण्याची आशा आहे.

पूर्व विदर्भात तयार करण्यात येणाऱ्या या नवीन महामार्गाचा फायदा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या ६ जिल्ह्यांना होणार आहे. या सर्व जिल्ह्या एकमेकांशी जोडले जाणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुसाट होणार आहे. या महामार्गामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

महत्वाचे म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील कोनसारी, सूरजागड यासारख्या दुर्गम भागात रस्ते पोहचल्यामुळे तेथील लोहखनिज आणि इतर उद्योगांना चालना मिळणार आहे. हे तिन्ही महामार्ग विदर्भातील प्रमुख केंद्रांना समृद्धी महामार्गासोबत जोडण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे या सहाही जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबईला जाण्याचा मार्ग देखील मोकळा होईल. 

प्रस्तावित महामार्ग - - नागपूर - गोंदिया द्रुतगती महामार्ग - १६२ किमी - नागपूर - चंद्रपूर महामार्ग - २०४ किमी - भंडारा - गडचिरोली - ९४ किमी

इतर बातम्या
Join Whatsapp Group