सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तब्बल 4,950 रुपयांनी भाव कमी झाल्याने आता 10 ग्रॅम सोन्यासाठी किती किंमत मोजावी लागणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे भाव आज चांगलेच कोसळले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याच विचार करत असाल तर आजचा दिवस हा खूप चांगला आहे.
आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 4 हजार 950 रुपयांची तर चांदीच्या 8 हजारांची घसरण झाली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर पाहून सर्वसामान्य नागरिकांना दिसाला मिळाला आहे. आज झालेल्या घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 53 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत.
दुसरीकडे एक किलो चांदीचे दर देखील 8 हजार रुपयांनी घसरल्यामुळे जीएसटीसह 2 लाख 37 हजार 930 रुपयांवर पोहोचले आहेत. महिनाभरात पहिल्यांदाच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.