मोठी बातमी ! 'या' माजी राज्यसभा  खासदाराची राजकारणातून निवृत्ती
मोठी बातमी ! 'या' माजी राज्यसभा खासदाराची राजकारणातून निवृत्ती
img
Nandini khandare More
राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.  एका माजी खासदाराने निवृत्ती जाहीर केली असून एकच खळबळ निर्माण झाली आहे. बहुजन समाज पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. बसपाचे माजी राज्यसभा खासदार आणि आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या घोषणेच्या अवघ्या एक दिवस आधी बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. 

‘बहनजीं’ची आज्ञा निवृत्तीची घोषणा करताना अशोक सिद्धार्थ यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मायावतींबद्दल एक भावनिक आणि सविस्तर पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी मायावती आणि बसपाप्रती आपली दीर्घकाळाची निष्ठा व्यक्त केली. ‘बहनजीं’ची आज्ञा आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे सांगताना, त्यांच्या मार्गदर्शनापुढे कौटुंबिक नातेसंबंधही दुय्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील 

आकाश आनंद यांच्या पुनरागमनाची शक्यता गेल्या आठवड्यात मायावती यांनी आकाश आनंद यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून हटवले होते. त्यानंतर बुधवारी मायावती यांनी आकाश आनंद यांना पुन्हा पक्षातील जबाबदारी देण्यासाठी त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्यासमोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यास, आकाश आनंद यांच्या राजकीय भवितव्याचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो, असे मायावती यांनी संकेत दिले होते. त्यामुळे अशोक सिद्धार्थ यांच्या निर्णयानंतर आकाश आनंद यांचे बसपामधील पुनरागमन होण्याची शक्यता चर्चेत आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group