येवला-मनमाड महामार्गावर गोपाळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार
येवला-मनमाड महामार्गावर गोपाळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार
img
दैनिक भ्रमर
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी बातमी समोर येत आहे. येवला-मनमाड महामार्गावरील गोपाळवाडी फाटा परिसरात अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या भीषण धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल चालक तरुणाचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला. मृत तरुण हा येवला तालुक्यातीलच रहिवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र येवला यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विलंब न करता रुग्णवाहिकेला पाचारण करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

​या अपघाताप्रकरणी सध्या येवला तालुका पोलीस ठाण्यात 'मोटर अपघात' अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेतला जात असून, या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस अत्यंत वेगाने करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group