राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा भीषण अपघात झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने गाडीचं मोठं नुकसान झालं.
विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेत्याच्या कारचा खामगावजवळ भीषण अपघात झाला आहे. मुंबई नागपूर महामार्गावर कैलास फाटे यांच्या कारला भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. कैलास फाटे यांनाही किरकोळ दुखापत झाली असून सध्या ते सुरक्षित असल्याची माहिती आहे. पण काँग्रेसने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ मुंबई नागपूर महामार्गावर कैलास फाटे यांच्या कारचा अपघात झाला. ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून कैलास फाटे यांना किरकोळ दुखापत झाली. ते थोडक्यात बचावले. बुलढाणा काँग्रेसकडून हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केलाय.