टायगर श्रॉफवरील गोळीबाराने बॉलिवूडमध्ये खळबळ! अक्षय कुमारच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
टायगर श्रॉफवरील गोळीबाराने बॉलिवूडमध्ये खळबळ! अक्षय कुमारच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
img
Nandini khandare More

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेनं चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. अक्षय कुमारच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमारनेही सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय कुमारच्या घरावर बुलेटप्रूफ काचा बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या निशाण्यावर अक्षय कुमारही असल्याची चर्चा असून, आरोपींनी त्याच्या घराची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. 

दरम्यान, अभिनेता सलमान खानच्या घराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येत आहे. सलमान खानच्या घरावर यापूर्वीच बुलेटप्रूफ काचा बसवण्यात आल्या होत्या. आता या काचा अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अपग्रेड केल्या जात असल्याची माहिती आहे. अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनांमुळे चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या प्रकरणातील माहितीची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group