मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! दुष्काळाचा 'जीआर' उद्याच
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! दुष्काळाचा 'जीआर' उद्याच
img
Nandini khandare More
राज्यात साह्य दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान आता मात्र शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला शासन निर्णय उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करत आहेत. यावेळी प्रामुख्याने अनेक ठिकाणी जलसाठे कोरडे पडले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल अशा पद्धतीची घोषणा देखील त्यांनी दौऱ्यादरम्यान केली. यासाठीच येत्या काळात शेतकऱ्यांना कशापद्धतीने दिलासा दिला जाणार तसेच किती मदत केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. पाऊस नसल्यामुळे उन्हाने पीक करपून गेली. अनेक शेतकऱ्यांनी शेतातून नांगर फिरवला, तर काहींनी पीकं जाळून टाकली. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. विरोधकांनी देखील तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील दुष्काळ भागात दौरा सुरू केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दुष्काळ जाहीर करण्याबाबत मोठी अपडेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील गावाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'उद्या कोरडा दुष्काळाचा जीआर काढण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. आपण शेतककऱ्यांना विम्याचे देखील पैसे देणार आहे.'

दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना विशेष करून शेतीसोबत जनावरे आणि पिण्याच्या पाण्यांचा प्रश्न गांभीर्याने दिसून येत आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात या प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. फडणवीस सरकारकडून या चारा छावण्या सुरू करण्यात येणार का? आणि शेतकऱ्यांसंदर्भात आणखी काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचे असेल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group