मोठी बातमी  एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड!  मोठी दुर्घटना टळली
मोठी बातमी एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड! मोठी दुर्घटना टळली
img
Nandini khandare More
 पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वडनगरमध्ये होते. याचदरम्यान आत अनेक मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे. गुजरात दौऱ्यावर असताना वडनगर येथे हा प्रकार घडला. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे वडनगरमध्ये होते. कार्यक्रम आटोपून ते अहमदाबादकडे परत निघण्याच्या तयारीत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. पायलटने वेळेत ही तांत्रिक अडचण लक्षात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

हेलिकॉप्टर उड्डाणासाठी योग्य नसल्याचे निश्चित झाल्यानंतर तातडीने उड्डाण रद्द करण्यात आले. या बिघाडामुळे आता उपमुख्यमंत्री शिंदे हे रस्ते मार्गाने अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. अहमदाबाद येथून ते पुढील प्रवासासाठी मुंबईकडे परततील अशी माहिती मिळाली आहे.  वृत्तानुसार, वडनगर येथील शर्मिष्ठा तलाव, हटकेश्वर मंदिरात महाआरती, बाईक रॅली व स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी शिंदे उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group