जम्मू-काश्मीरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका बड्या नेत्याने राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं असल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.
श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा रुहुल्लाह मेहदी यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटलं. “खोटेपणा आणि विश्वासघाताचा भाग बनायचे नाही,” अशी स्पष्ट भूमिका रुहुल्लाह यांनी घेतली आहे.
अभिनेता इमरान हाश्मीला 'स्वाइन फ्लू'ची लागण !
आगा रुहुल्लाह यांनी सांगितले की, 3 नोव्हेंबर 2026 रोजी ते लोकसभा अध्यक्षांसह नॅशनल कॉन्फरन्सकडे अधिकृतपणे आपला राजीनामा सुपूर्द करतील. विशेष म्हणजे, हा दिवस त्यांचे वडील आगा सैयद मेहदी यांच्या 26व्या पुण्यतिथीचा दिवस आहे. दहशतवाद्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. राजीनामा दिल्यानंतर श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेतही रुहुल्लाह यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा जम्मू-काश्मीरच्या आगामी राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील 24 तासांत पावसाचा कहर? महाराष्ट्रासह 26 राज्यांना अलर्ट
2024 च्या लोकसभा निवडणुकीत आगा रुहुल्लाह यांनी श्रीनगर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांना 3,56,866 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (PDP) उमेदवार वहीद पारा यांना 1,68,450 मते मिळाली होती. दरम्यान, पक्षाध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांना थेट पत्र लिहून रुहुल्लाह यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावरही व्हायरल केले. जम्मू-काश्मीरच्या राज्याच्या दर्जाबाबत पक्षाची भूमिका आता भाजपपेक्षा वेगळी राहिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.