अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या एक्शन मोड मध्ये असून राज्यातील भेसळयुक्त अन्न पदार्थ विकणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. दरम्यान आता तुकाराम मुंढें यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात आजपासून सुट्ट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी दुध भेसळसह सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी आता आपला मोर्चा थेट खाद्यतेलाकडे वळवला आहे. त्यांनी सुट्टे तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे राज्यभरातील दुकानदारांना सुट्टे तेल विकता येणार नाही.
अन्न व औषध प्रशासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या संदर्भात अंमलबजावणी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, आजपासून राज्यात सुट्टे तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याच दुकानदारांना सुट्टे तेल विकता येणार नाही. जर या नियमांचे उल्लंघन केले तर त्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.