ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यूची लागण ! रुग्णालयात उपचार सुरू
ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यूची लागण ! रुग्णालयात उपचार सुरू
img
Nandini khandare More
ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूनम या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. 

दरम्यान, पूनम यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. ‘ पूनम यांची प्रकृती आता स्थिर असून त्या वेगाने रिकव्हर होत आहेत. प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत’ अस पद्मिनी कोल्हापुरे यांनी नमूद केलं.

पूनम यांनी 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘त्रिशूल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार आणि शशी कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. त्यानंतर त्या काला पत्थर, नूरी, दर्द, तेरी कसम, यादगार, लेला, कयामत, गिरफ्तार, तेरी महरबानियां, कर्मा नाम आणि मालामाल अशा अनेक चित्रपटांत झळकल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group