पुढील 10 दिवसांत 6 दिवस बँका बंद; महाराष्ट्रात बँकांना केव्हा सुट्टी ?
पुढील 10 दिवसांत 6 दिवस बँका बंद; महाराष्ट्रात बँकांना केव्हा सुट्टी ?
img
Nandini khandare More
पुढील १० दिवसांत बँकेची कुठली पेंडिंग कामे करायची असतील तर ही बातमी तुमचा साठी आहे. कारण तुम्ही हे वेळापत्रक न बघता बँकेत गेले तर तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया पुढील १० दिवसांत  कोणत्या राज्यात बँकांना केव्हा सुट्ट्याआहेत. 

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या १० दिवसात बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २१ ते ३१ ऑगस्टदरम्यान एकूण ६ दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. मात्र या सर्व सुट्ट्या देशभर एकाच वेळी लागू नसून काही सुट्या राज्यनिहाय आहेत. त्यामुळे बँकेत महत्त्वाचे काम असेल तर संबंधित तारखेची आणि आपल्या राज्यातल्या सुट्टीची माहिती आधी तपासणं गरजेचं आहे.

२१ ऑगस्टला देशातल्या कोणत्याही राज्यात बँकांना सुट्टी नाही. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी चौथा शनिवार आणि २३ ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.

यानंतर २५ ऑगस्ट रोजी केरळ आणि आंध्र प्रदेशात मिलाद-उन-नबी आणि पहिला ओणम यानिमित्त बँका बंद राहतील. २६ ऑगस्टला महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, जम्मू -काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये ईद-ए-मिलाद आणि तिरुवोणममुळे बँकांना सुट्टी असेल.

यानंतर १५,२१,२२,२३ आणि २५ सप्टेंबरलाही विविध राज्यांमध्ये प्रादेशिक सणांनिमित्त बँकांना सुट्टी असेल. बँक हॉलिडे राज्यानुसार बदलतात. त्यामुळे प्रत्यक्ष बँकिंग कामासाठी आपल्या राज्यातल्या आणि संबंधित बँकेच्या सुट्टीची यादी तपासणे महत्त्वाचे आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group