.....अन्यथा 16 ऑगस्टनंतर गॅस सिलिंडर मिळणार नाही ! LPG ग्राहकांनो आताच हे काम करा
.....अन्यथा 16 ऑगस्टनंतर गॅस सिलिंडर मिळणार नाही ! LPG ग्राहकांनो आताच हे काम करा
img
Nandini khandare More

गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी ग्राहकांनी आता एक महत्त्वाचं काम पूर्ण करणं गरजेचं आहे. एलपीजी कनेक्शनच्या ई-केवायसीसाठी दिलेली मुदत संपण्याच्या मार्गावर असून, 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांसमोर पुढील काळात अडचणी निर्माण होऊ शकतात. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026 ही आहे. या तारखेनंतर एलपीजी गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी केली नाही, तर गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्याचबरोबर एलपीजी सिलिंडरवर मिळणार सबसिडीचे लाभ देखील मिळणार नाही.

गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी करणे सर्व जुन्या ग्राहकांना अनिवार्य आहे. ज्या ग्राहकांनी ई-केवायसी केलं आहे. त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. खरंतर ज्या जुन्या ग्राहकांनी ई-केवायसी केली नाही, त्यांचासाठी अत्यंत गरजेची सूचना आहे. तसेच ई-केवायसी इंडेन, भारत गॅस आणि एचपी या तीन कंपन्यांच्या ग्राहकांसाठी आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थींसाठी देखील केवायसी करणे गरजेचे आहे.

एलपीजी ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने ई-केवायसी करू शकता. ऑफलाइन ई-केवायसी करण्यासाठी गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. या ऑफिसमध्ये जाताना आधार, पॅन, फोटो देणे अनिवार्य ठरणार आहे. या व्यतिरिक्त मोबाइल अॅपच्या मदतीने ई-केवायसी मिनिटांत करता येणार आहे. ऑनलाइन ई-केवायसी करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेची असणार आहे.

कोणत्याही ग्राहाकांना ऑनलाइन ई-केवायसी करताना समस्या येत असेल. त्यांनी गॅस एजन्सीच्या ऑफिसशी संपर्क साधणे फायदेशीर ठरेल. डेडलाइनमुळे एलपीजी ग्राहकांना लवकरच प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ठराविक ग्राहकांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही. त्यांना पंतप्रधान उज्ज्वल्ला योजनेअंतर्गत येणाऱ्या सबसिडी योजनेचाही लाभ मिळणार नाही.

तुम्ही दिलेल्या डेडलाइनमध्ये ई-केवायसी केली नाही. तर घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 16 तारखेनंतर ई-केवायसी करू शकता. परंतु ही बाब लक्षात घ्यावी लागेल की, ई-केवायसी केल्याशिवाय गॅस सिलिंडर मिळणार नाही. याचा अर्थ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच गॅस सिलिंडर मिळणे सुरू होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group