पालक आपल्या चिमुकल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शिक्षकांच्या भरोशावर सोडून जातात. पण आजकाल शाळेंमधून अनेक धक्कादायक घटना समोर येत असून आता एक अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे.
अवघ्या किंडरगार्डनमध्ये शिकणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाला होमवर्क पुर्ण न केल्याने शिक्षिकेने चांगलेच खडसावले आणि त्यानंतर त्याच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर हा विद्यार्थी बेशुद्ध होऊन जमीनीवर निपचित पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा म्हटले जात आहे. सीसीटीव्ही ही घटना कैद झाली आहे. आता पालकांनी मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावेळी अशी मागणी केली आहे.
सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना ! 100 हून अधिक जणांचा मृत्यू
ही घटना आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम येथे घडल्याचे सांगितले जाते. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मुलगा अन्य सहकारी विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभा असलेला दिसत आहे. फुटेजनुसार मुलगा भेदरलेला आहे. शिक्षक त्याच्या युनिफॉर्मला नीट करताना दिसत आहे. या दरम्याने हे मुल रडू लागले. आणि शिक्षक त्याला कानाखाली मारतात. कानाखाली बसल्यानंतर मुल त्या शिक्षकेवरच पडते. घटनेनंतर शाळेत अफरातफरी माजते. या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलांचे पालक आणि नातेवाईक या शाळेत पोहचतात. हा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबियांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात नाराजी घेतली. कुटुंबियांनी या मुलाला मारल्याने त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, प्रथमदर्शनी या मुलाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे म्हटले जात आहे. मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेमनंतर कळेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवालानंतर येईल असे म्हटले जात आहे.