लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान प्रसिद्ध गायकाचा संताप ! म्हणाला  ‘एका बापाचा असशील तर समोर ये…’,
लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान प्रसिद्ध गायकाचा संताप ! म्हणाला ‘एका बापाचा असशील तर समोर ये…’,
img
Nandini khandare More

लाईव्ह कॉन्सर्ट शोजमध्ये कलाकारांवर प्रेक्षकाडून अनेकदा , अंडे , कपडे अशा प्रकारच्या वस्तू फेकण्याचे प्रकार अनेकदा घडतात. दरम्यान आता अशीच एक घटना समोर आली आहे. 

पंजाबी म्यूझिक इंडस्ट्रीतील सुपरस्टार करण औजला सध्या इंटरनॅशनल ‘पी – पॉप कल्चर टूर’वर आहे. करण याच्या आवाजावर सध्या संपूर्ण जग थिरकत आहे.. पण ऑस्ट्रेलिया येथील एडिलेड शहरात झालेल्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान असं काही झालं, ज्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. गायकाचं लाईव्ह परफॉर्मेंस सुरु होतं, तेव्हा एका चाहत्यांने स्टेजवर जॅकेट फेकला, जे गायक करण याला बिलकून आवडलं नाही. ज्यामुळे गायक प्रचंड भडकला. या हाय व्होल्टेड ड्राम्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, ही घटना 16 ऑगस्ट रोजी एडिलेड एंटरटेनमेंट सेंटर एरिना येथे घडली. करण औजला स्टेजवर जबरदस्त सादरीकरण करत असतानाच, गर्दीतील एका व्यक्तीने गायकाच्या दिशेने जॅकेट भिरकावलं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तो अवाक् झाला आणि त्याला प्रचंड राग आला. अशात त्याने गाणं थांबवलं आणि थेट पंजाबी भाषेत बोलायला सुरुवात केली.

स्टेजवर जॅकेट येताच गायकाने गाणं थांबवलं आणि संतापला. त्याने थेट चाहत्याला आव्हाला देत म्हटलं, ‘हिंमत असेल तर, समोर येऊन बोल. मी पण पाहतो तू एका बापाचा आहेस की नही…’, गायकाचं हे आक्रमक रुप पाहून सर्व चाहचे शांत झाले. ज्या चाहत्याने जॅकेट फेकलं होतं त्याची ओळख पटल्यावर, करणने त्याला थेट विचारलं, “तू प्रेमात पडला आहेस का? तू वेडा झाला आहेस का?” त्यानंतर त्या गायकाने त्या चाहत्याची समजूत काढताना सांगितलं की, येथे कोणाचीही थट्टा-मस्करी करण्यासाठी आलेले नाहीत आणि अशा वागणुकीमुळे स्वतःचा तसेच इतरांचाही वेळ वाया जातो.

संतापानंतर दाखवलं मोठं मन

सुरुवातीला संतापलेल्या गायकाने शांत होत चाहत्याला सांगितलं, ‘डार्लिंग असं करु नकोस… मुझे नाही माहिती तू प्रेमात आहेस की रागात… पण ही पद्धत नाही. दे तो जॅकेट, मी त्यावर ऑटोग्राफ देतो…’, सध्या घडलेल्या घटनेचा व्हिडओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group