'लालपरी'च्या प्रवाशांसाठी मोठी बातमी!  1 ऑक्टोबरपासून ''हा'' नियम बदलणार, आता NCMC कार्ड...
'लालपरी'च्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून ''हा'' नियम बदलणार, आता NCMC कार्ड...
img
Nandini khandare More
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती MSRTCने अधिकृत एक्स पोस्टच्या मार्फत दिली.

या निर्णयामुळे सवलतीच्या तिकीट व्यवस्थेत डिजिटल प्रणालीचा वापर वाढणार आहे. एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या सामाजिक घटकांना शासनाच्या निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. आता या सवलतीचा वापर सोपा आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.

NCMC कार्ड नसल्यास काय होणार? 

१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच वितरित केले जाणार आहे. मात्र, ज्या प्रवाशांकडे Active NCMC कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे. नोंदणी पावती वाहकाच्या ETM मशीनवर स्कॅ करून तिकीट घेता येईल. ही पावती ३० दिवसांपर्यंत वैध राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड अॅक्टीव्ह करून त्यामध्ये Top-up करणं गरजेचं आहे.

कार्ड नोंदणी कुठे करता येणार? NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण एसटी बसस्थानके, आगार तसेच अधिकृत केंद्रावर करण्यात येत आहे. ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. BHIM App वरून करता येईल Top-up कार्डमध्ये पैसे भरण्यासाठी BHIM Appचा वापर करता येणार आहे. कार्डावर QR कोड स्कॅन करून Top-up करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, आधाक बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यास, आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून NCMC कार्ड नोंदणी करण्याची पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र महिला आणि जेष्ठ नागरिकांनी १ ऑक्टोबरआधी NCMC कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group