फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार
img
Nandini khandare More

आज  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. यासह वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांचीही या बैठकीत उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुष्काळासंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर काही तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळले होते. याच वगळलेल्या तालुक्यांबाबत आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आालाय. या निर्णयामुळे आता हजारो शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक नियमित घ्याय मंत्र्यांनी आपल्या सूचना नियमितपणे या उपसमितीकडे द्याव्यात, असे फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. तसेच जे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झालेले नाहीत, त्याबाबत अन्य निकष लावून मदतीबाबत प्रस्ताव सादर करावा असा महत्त्वाचा आदेश फडणवीस यांनी दिला.


पाणीवापरासाठी स्पष्ट जिआर काढा
दुष्काळाच्या या काळात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो. पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणूनच पाणीवापर कसा करायचा याचा स्वयंस्पष्ट GR काढा, पिण्याचे पाणी गृहीत धरताना त्यात जनावरांचे पाणी समाविष्ट करा आणि नंतर इतर प्राधान्यक्रम ठरवा, असाही आदेश फडणवीस यांनी दिला.

डीपीडीसीमध्ये अधिकाधिक कामे ही दुष्काळ निवारणाची घ्या. पालकमंत्र्यांनी कल्पकतेने स्थानिक स्तरावर काय निर्णय घेता येईल, यावर लक्ष द्यावे, अशा सूचना फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना केल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका, असा महत्त्वाचा आदेश फडणवीस यांनी दिलाय. फडणवीस यांच्या या आदेशामुळे आता विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळलेल्या काही तालुक्यांना आता फडणवीस यांच्या या निर्णयामुळे दिलासा मिळू शकतो. या तालुक्यांतही पाऊस कमी झालेला आहे. परंतु निकष पूर्ण न केल्याने या तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्य मार्गाने मदत केली जाणार आहे. ही मदत कशी असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आगामी काही दिवसात अधिक स्पष्टता येईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group