मोठी बातमी ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली; 'ही'' आहे अंतिम तारीख
मोठी बातमी ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली; 'ही'' आहे अंतिम तारीख
img
Nandini khandare More

करदात्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून, तांत्रिक अडचणी आणि झालेला विलंब लक्षात घेता आता करदात्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत रिटर्न दाखल करता येणार आहे. या मुदतवाढीमुळे ऐन मोक्याच्या वेळी टॅक्स रिटर्न भरताना होणारी धावपळ थांबणार असून, करदात्यांना आपले आर्थिक व्यवहार व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मोठा वेळ मिळाला आहे.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) २८ सप्टेंबर २०२६ रोजी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. संबंधित करदात्यांसाठी ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ होती. याबाबतचा अधिकृत आदेश/अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३९ (१) अंतर्गत ज्या व्यक्ती आणि कंपन्यांना ऑडिट रिपोर्ट (लेखापरीक्षण अहवाल) सादर करणे बंधनकारक असते, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू असेल. या करदात्यांसाठी ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. आता त्यांना २१ ऑक्टोबर २०२६ ऐवजी वाढीव मुदतीत आपला अहवाल सादर करता येणार आहे. या मुदतवाढीमुळे ऐन सणासुदीच्या काळात सीए (CA) आणि करदात्यांना आपले आर्थिक व्यवहार व रिटर्न व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मोठा वेळ मिळाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group