कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात ! ५ जणांचा जागीच मृत्यू
कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात ! ५ जणांचा जागीच मृत्यू
img
Nandini khandare More
कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात घडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.  

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील करनाह परिसरात एक भीषण अपघात झालाय. जखमी झालेल्यांना जीएमसी हंदवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये महिलांसह पुरुष आणि मुलांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय. 

जम्मू-काश्मीर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केलाय. आपल्या शोक संदेशात सिन्हा म्हणाले की, कुपवाडामध्ये दुर्दैवी घटना घडलीय. सिन्हा यांनी मृतकांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केलीय. जखमींना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात अशा सुचना उपराज्यपाल सिन्हा यांनी जिल्हा प्रशासनाला दिलीय.

खोल दरीत कार कोसळली, ६ जणांचा मृत्यू मागील महिन्यातही जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात असलेल्या सुरनकोटच्या शेलधर परिसरात असा एक अपघात घडला होता. वाहन अनिंयत्रित झाल्यानंतर हे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. पुंछचे सीएमओ डॉ. परवेझ खान यांनी दिलेल्या महितीनुसार मृतकांमध्ये ४ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. या सर्वांचे वय २० ते २४ दरम्यान होते.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी पुंछ सुरनकोट येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला होता. तसच अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांची सांत्वन करत त्यांना धीर दिला होता. तसेच जखमींना योग्य उपाचर मिळावेत यासाठी प्रशासनाला आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group