भीषण अपघाताने दुर्दैवी अंत! भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तीन तरुणांचा जागीच मृत्यू!
भीषण अपघाताने दुर्दैवी अंत! भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तीन तरुणांचा जागीच मृत्यू!
img
Nandini khandare More

एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरधाव वाहनांमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने पुन्हा एकदा वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, आबूरोड परिसरात घडलेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री रीको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मावल कटजवळ हा अपघात घडला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघांना आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एक ट्रक आबूरोड येथून पालनपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी मावल कटजवळ ट्रकने समोरून नव्हे, तर त्याच दिशेने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत होते. धडक इतकी जोरदार होती की तिघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रीको पोलीस ठाण्याचे अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणांना तातडीने रुग्णवाहिकेतून आबूरोड येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवले. विशेष म्हणजे, तिन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची नावे आणि पत्ते शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून ट्रक आणि चालकासंदर्भातील माहिती गोळा केली जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचाही शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group