पुण्यामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई बेंगलोर हायवेवर आज पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका जास्त होता की पुढील भागाचा चक्काचूर झाला. कारमधील ४ जणापैकी दोघांचा अपघात दुर्देवी मृत्यु झाला.
सिद्धांत आनंद वय २२, दिव्यराज सिंग राठोड वय २३ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा अपघातात मृत्यु झाला तर निहाल तांबोळी वय २०, हर्षवर्धन मिश्रा वय २२ हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वास्तविक पहाता मागील दोन दिवसांपूर्वी अपघाताठिकाणी महार्गावर वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी पांढऱ्या पट्टया लावण्यात आल्या आहेत. पण याच पट्ट्या आता वाहन चालकांचा काळ बनत आहेत. आज पहाटे झालेल्या अपघाताला याच गतीरोधक पट्ट्या कारणीभूत असल्याचं काही नागरीकांचं म्हणणं आहे. पुढे जाणाऱ्या भरधाव वाहनाचा अचानक वेग कमी झाल्याने मागील वाहन धडकून अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.