मालवाहू रेल्वेच्या धडकेत प्रवासी मॅजिक गाडीचा चक्काचूर
मालवाहू रेल्वेच्या धडकेत प्रवासी मॅजिक गाडीचा चक्काचूर
img
दैनिक भ्रमर

मनमाड (सौ. नैवेद्या बिदरी) :- शहरातील चंदनवाडी परिसरात भारतीय खाद्य निगम मंडळ अर्थात एफसीआय गोडाऊनला रॅक घेऊन जाणार्‍या डिझेल इंजिनने प्रवासी वाहतूक करणार्‍या मॅजिक गाडीला धडक दिल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून प्रवासी मॅजिक गाडीचा मात्र या अपघातात चक्काचूर झाला आहे. मनमाड शहरात भारतीय खाद्य निगम मंडळाचे मोठे गोडाऊन असून रेल्वे मार्फत नेहमीच अन्न व खाद्याचे वाहतूक केली जाते. आज पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान शहरातील चंदनवाडी परिसरात असलेल्या लोहमार्गावरून भारतीय खाद्य निगम अर्थात एफसीआयकडे रॅक घेऊन जाणार्‍या डिझेल इंजिनने प्रवासी मॅजिक गाडीला धडक दिल्याची घटना घडली.

या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रवासी मॅजिक गाडीचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात  नेमका कसा घडला, हे कोणीही सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून या लोहमार्गावर तासनतास मालवाहू रेल्वे उभी रहात असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

या परिसरातील लोकांना गावात येण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने यावर काही तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group