राज्यात २९ महानगर पालिकांसाठीची मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. अनेक निकाल समोर आले आहे. राज्यात अनेक दिग्गजांना मनपा निवडणुकीत धक्का बसला आहे. पुणे मनपाचा निकाल सामोर आला आहे.भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपने दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.पुण्यात पुन्हा एकदा भाजपने महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकावला आहे.
पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यवर्ती भागातील बहुतांश सर्वच भागात भाजपचा झेंडा पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत भाजपकडून ७ पॅनल विजयी झाले आहे.पुण्यात भाजपने सर्वत्र आघाडी घेतल्याने शहरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणा देत आनंद साजरा केलाय.