राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अजित पवारांच्या अकाली निधनाने बारामतीसह राज्याला धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या जाण्याने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झालाय.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज चार सभा घेणार होते. अशातच अजित पवार यांची सकाळपासून फोनाफोनी चालू होती. अशातच आता अजित पवार यांनी शेवटचा फोन कुणाला केला होता? याची माहिती समोर आली आहे.
अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झाला होता. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या आहेत. विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं राणाजगजीतसिंह यांच्यासोबत बोलणं झालं होतं. मी नंतर फोन करतो म्हणत अजित पवार यांनी नंतर फोन करणार असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार होतं पण त्याआधीच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.