आमदार रोहित पवार हे अजितदादांच्या विमान अपघातावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी DGCA, सीआयडी, विमान वाहतूक मंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. VSR कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाप्रकरणी रोहित पवार यांनी DGCA विरोधात तक्रार करण्याची मागणी केली. ते थेट मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर हे पण उपस्थित होते. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि त्यांच्यात मोठा वाद पेटला.
यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. इतके पुरावे आहेत न्यूजमध्ये सगळं आलेलं आहे, कारवाई का केली जात नाही, असा सवाल विचारात पोलीस ठाण्यामध्ये हे नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर आक्रमक झालेले आहेत, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी या नेत्यांची आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं आहे. त्यामुळे फक्त कारवाई करू अशी आश्वासन नको आहेत. तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील या नेत्यांनी केली आहे.
डीजीसीएच्या अहवालामध्ये देखील व्हिएसआर कंपनीची चूक होती ती समोर आली आहे, कंपनीचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. या दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा प्रामुख्याने दाखल करावा आणि यामध्ये दोघांचाही समावेश आहे, अपघात झाला त्यावेळी डीजीसीएकडून हा अपघात असल्याचं म्हटलं होतं, मात्र दुसरीकडे व्हिएसआर कंपनीचा जो निष्काळजीपणा होता, मेंटेनन्स ठेवलेला नव्हता हे समोर आल्यानंतर या दोन्ही संस्थाच्या संबंधित अधिकाकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल कराला या मागणीसाठी रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
रोहित पवार यांनी पोलिस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना धारेवर धरत विचारले की, "राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर (FIR) का दाखल करत नाहीत?" विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
तर आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस केवळ चौकशीचे नाव सांगून वेळकाढूपणा करत आहेत," असे मिटकरी म्हणाले. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंढे तातडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात जोरदार वादावादी झाली. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली.