२८ एप्रिल २०२६
अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर दूखाचा डोंगर कोसळला होता. अजूनही या दूखातून महाराष्ट्र पुर्णपणे सावरलेला नाही. त्यांच्या निधनाला तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप अजित पवारांच्या विमानाला खरंच अपघात झाला की त्यांच्यासोबत घातपात घडला? याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.
शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार सातत्याने अजित पवारांच्या अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच ते विविध पुरावे समोर आणत खुलासे करत आहेत. मात्र तपासातून अद्याप काहीच ठोस माहिती समोर येत नाहीये.
अजित पवार यांच्या निधनाला तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये 1 फोटो, 1 इमोजी अन् 4 शब्दात ही पोस्ट लिहिली आहे. या फोटोत सुप्रिया सुळे आणि अजित पवार एका सोफ्यावर बसल्याचं दिसत आहेत.
दोन्ही भावंडं हसत गप्पा मारताना दिसत आहेत. सुप्रिया सुळेंनी हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये 'Dada, we miss you' असं लिहिलं आहे. सोबतच त्यांनी 'ब्रोकन हार्ट' इमोजी जोडला आहे. सुप्रिया सुळेंची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Copyright ©2026 Bhramar