आई-वडिलांचा शब्द अन् उच्चशिक्षित जोडी! इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा संपन्न; पाहा कोण आहेत त्यांचे इंजिनिअर जावई?
आई-वडिलांचा शब्द अन् उच्चशिक्षित जोडी! इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा संपन्न; पाहा कोण आहेत त्यांचे इंजिनिअर जावई?
img
नितीशा कुलकर्णी




आपल्या अमोघ वाणीने समाजाला प्रबोधन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या घरी सध्या सनई-चौघड्यांचे सूर घुमत आहेत. कन्या ज्ञानेश्वरी आणि नवी मुंबईचे तरुण उद्योजक सुपुत्र साहिल चिलप यांचा शाही विवाह सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर, आता या नवदाम्पत्याच्या जेजुरी दर्शनाचे मोहक फोटो समोर आले आहेत.

आई-वडिलांच्या शब्दाखातर उच्चशिक्षित असूनही विवाहाचा निर्णय घेणाऱ्या या जोडप्याची साधी राहणी सध्या नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच आता ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या जेजूरी देव दर्शनाचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये साहिल आणि ज्ञानेश्वरी भंडाऱ्याची जेजूरी गडावर भंडाऱ्याची उधळण करतांना दिसत आहे. साहिलने ज्ञानेश्वरीला गडावर नेण्यासाठी उचलूनही घेतले आहे.

इंदुरीकर महाराजांचे जावई, साहिल चिलप मुळचे नवी मुंबईचे असून त्यांनी इंजीनिअरिंगचं शिक्षण गेल्यावर्षीच पूर्ण केलं. तर इंदोरीकर महारजांची कन्या, ज्ञानेश्वरी हिनेही एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण केलं. गेल्यावर्षी दोघेही शिक्षण घेत असतानाच कुटुंबाने लग्नाचा निर्णय घेतला. साहिल आणि ज्ञानेश्वरी दोघेही आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते, त्यामुळे लग्नाचा प्रस्ताव आल्यावर, त्यांनीही या लग्नाला संमती दर्शवली. दोघांनीही साखरपुड्यासाठी होकार दिला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group