भयंकर! मैत्रीच्या जाळ्यात ओढून महिलांना दिला अंमली पदार्थांचा डोस; टीसीएस प्रकरणात 'नार्को' अँगलने तपास सुरू
भयंकर! मैत्रीच्या जाळ्यात ओढून महिलांना दिला अंमली पदार्थांचा डोस; टीसीएस प्रकरणात 'नार्को' अँगलने तपास सुरू
img
नितीशा कुलकर्णी









नाशिक येथील टीसीएस कंपनीतील महिलांच्या छळवणुकीचे प्रकरण आता अधिक गडद होत चालले आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना ५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून धक्कादायक कबुलीजबाब मिळण्याची शक्यता आहे. पीडितांना मादक पदार्थ खाऊ घालून त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि कंपनीच्या आवारातच धर्मांतराचे जाळे विणणे, अशा गंभीर आरोपांखाली पोलीस आता 'नार्को' अँगलने तपास करत आहेत. त्यातच फरार आरोपी निदा खानचा जामीन फेटाळल्याने पोलिसांचे पाऊल आणखी भक्कम झाले आहे.

टीसीएस कंपनीतील एका विशिष्ट धार्मिक गटाकडून महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या प्रकरणाने देश हादरला. टीसीएस सारख्या बहुराष्ट्रीय मानांकित कंपनीतील याप्रकाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. प्रकरणातील एक फरार आरोपी निदा खान ही अजूनही यंत्रणांना गुंगारा देत आहे. तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून न्यायालयाने दणका दिला. याप्रकरणातील चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनाववली. या प्रकरणातील आरोपींचे दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचे समोर येत असतानाच अजून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

नाशिक येथील टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीकरकर औषध दिल्याचा दाट संशय यंत्रणांना आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, शीरखुर्मासारख्या गोड पदार्थातून या पीडितांना आरोपींनी नशेचा पदार्थ दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. मैत्री झाल्यानंतर या महिलांना शीरखूर्मा देण्यात आला. त्यात नशेचे पदार्थ असल्याचा दावा करण्यात येत आहे. या खुलाशाने आता खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडित महिलांना कामूक करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात होता. पीडित महिलांना मादक पदार्थ खाऊ घालतं लैंगिक अत्याचार केल्याचा संशय आहे. नाशिक पोलीस आता या अँगलने तपास करत आहेत.

चार आरोपींना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी याप्रकरणातील चार आरोपींना आरोपींना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कोठडीत मांसाहारासह गुंगीकारक आणि मादक पदार्थ सेवन करण्यासाठी दिल्याचा पोलीस तपास करणार आहेत. या कोठडीत आरोपी काय कबुलीजबाब देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्हय वक्तव्य करत असत. तर कंपनीच्या ग्रुपवर अश्लिल शेरेबाजी करत असल्याचे चॅटिंगमधून समोर आले आहे. इतकेच नाही तर कंपनीकडून विशेष धार्मिक सूट मिळाल्याचा गैरफायदाही त्यांनी घेतल्याचे धर्मांतरणाच्या प्रयत्नातून समोर आले आहे.

टीसीएस प्रकरणातील आरोपी

निदा खान (अजूनही फरार, काल अटकपूर्व जामीन फेटाळला)

दानिश एजाज शेख

तौसीफ बिलाल अत्तार

रझा रफीक मेमन

शाहरूख हुसेन शौकत कुरेशी

शफी शेख

आसिफ अन्सारी

अश्विनी चैनानी
इतर बातम्या
Join Whatsapp Group